dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून;  विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आहे. “सत्ताधारी पक्ष बहुमताच्या मस्तीत असून लोकशाही आणि संविधानाचा कोणताही सन्मान राखला जात नाही. अशा ‘निर्लज्ज’ आणि ‘दुटप्पी’ वागणाऱ्या सरकारच्या चहापानाला आम्ही जाणार नाही,” असा घणाघात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

भास्कर जाधव म्हणाले, आम्हा सर्वांना चहापानासाठी वैयक्तिकरित्या मुख्यमंत्री महोदयांचे पत्र आलेले आहे. परंतु, आम्ही त्या पत्रांवरून त्यांच्या चहापानाला जाणार नाहीत. सरकारच्या चहापानाला जाणार नाहीत, याचा अर्थ ही नेहमीचीच प्रथा पडलीये, असे आपल्याला वाटत असेल. तर तसे अजिबात नाही. मुळात सत्ताधारी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षाचे वर्तन हे सभ्यतेचे असावे लागते. लोकशाहीचा सन्मान करणारे आणि आपल्या देशाची राज्यघटना, डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा सन्मान करणारे अशा पद्धतीचे वर्तन, अशाप्रकारची सभ्य वागणूक ही सत्ताधारी पक्षाची असावी लागते. परंतु, प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये आहे. 

अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय

भास्कर जाधव यांनी अधिवेशनापूर्वीच अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात? अशी ठाम शंका संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आहे. सरकार यावर कुठेही स्पष्ट नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या एका जबाबदार नेत्याचा घात की अपघात? अशाप्रकारची जेव्हा चर्चा असते, त्यामुळे आम्ही चहापानाला जायचे नाही, असा निर्णय घेतलेला आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top