शिवरायांचा पुतळा हटविण्याला विरोध करणाऱ्या महिलेस बेदम मारहाण

लोणार : छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविण्यास विरोध करणाऱ्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण करून तिचे कपडे फाडल्याची संतापजनक घटना 20 फेब्रुवारीच्या रात्री लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे घडली.

लोणार : छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविण्यास विरोध करणाऱ्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण करून तिचे कपडे फाडल्याची संतापजनक घटना 20 फेब्रुवारीच्या रात्री लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे घडली. राष्ट्रमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्हयात ही घटना घडल्याने या घटनेचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. घटनेची माहिती मिळताच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील  चिखला काकड गावाकडे निघाले आहेत. तर दुसरीकडे उबाठा पक्षाचे मेहकरचे आमदार सिध्दार्थ खरात यांच्यासह सिंदखेडराजाचे माजी आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते व विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवत आरोपीला अटक करण्याची मागणी करीत चिखला काकड येथे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.

चिखला काकड गावाचे सरपंच यांच्या चिथावणी वरून आपणास सामूहिक मारहाण करण्यात आली असून कपडे फाडण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडिता महिला आघाडीच्या उप जिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांनी केला असून  आता जाहीर बेआब्रू झाल्याने जगण्यात अर्थच न उरल्याने आपण आज आत्महत्या करणार असे ‘व्हाट्स अप स्टेटस’ या महिलेने ठेवले आहे. यामुळे गाव परिसरासह राजकीय व सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आज शनिवारी, २१ फेब्रुवारी रोजी सकाळीच लोणार तालुक्यासह विविध तालुक्यातील ठाकरे सेनेचे व इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शिवसैनिक, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी चिखला काकड गावात दाखल झाले. त्यांनी या घटनेचा निषेध करीत गावात ठिय्या मांडला.

 येथे काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र, गावचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांकडून हा पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरू होत्या. याची माहिती शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी सदर ठिकाणी धाव घेतली आणि पुतळा हटवण्यास विरोध केला. याचा राग मनात धरून गावाच्या सरपंचांनी गावातील काही महिला आणि पुरुषांना जमा केले. या जमावाने वाघ यांना घेराव घालून बेदम मारहाण केल्याचा आरोप संजीवनी वाघ यांनी केला आहे. या झटापटीत संजीवनी वाघ यांच्या अंगावरील कपडे फाडण्यात असून ‘सोशल मीडिया’वर या घटनेचे ‘व्हिडिओ’मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रकरणाची दखल घेतली असून ते संजीवनी वाघ यांची भेट घेणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »