dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी वाशिम दुमदुमले

वाशिम : मेरा युवा भारत केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा ;जय भवानी जय  शिवाजी’च्या घोषणांनी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण करत पार पडली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला.

 ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेला उस्फूर्त प्रतिसाद

वाशिम : मेरा युवा भारत केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा ;जय भवानी जय  शिवाजी’च्या घोषणांनी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण करत पार पडली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष अनिल केंदळे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार नीलेश पळसकर, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे तसेच एनसीसी अधिकारी अमोल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवाजी चौक येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. प्रमुख मार्गावर नागरिकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत देशभक्तीपर घोषणांमध्ये सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांचा उत्साह, आकर्षक वेशभूषा आणि शिस्तबद्ध संचलनामुळे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले.  एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित गीत व पथनाट्य पदयात्रेचे विशेष आकर्षण ठरले . या सादरीकरणातून स्वराज्य, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांना दाद दिली.अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला व्यापक प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप पट्टेबहादूर यांनी केले.

पारंपरिक वेशात सजलेल्या विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष

या पदयात्रेत राष्ट्रीय छत्र सेनेचे विद्यार्थी, शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थी, स्काऊट गाईड्स तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हातात देशभक्तीपर फलक, घोषवाक्ये आणि पारंपरिक वेशभूषेमुळे पदयात्रेला विशेष रंगत आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top