dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दोन्ही देशांचे संबध विशेष आणि अद्वितीय : मॅक्रॉन

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. पत्रकार परिषदे दरम्यान पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांचे स्वागत करताना आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत-फ्रान्स भागीदारी ही केवळ धोरणात्मक नाही तर स्थिरता आणि जागतिक प्रगतीची भागीदारी आहे.

भारत-फ्रान्स भागीदारी ही केवळ धोरणात्मक नाहीतर जागतिक प्रगतीची :  मोदी

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. पत्रकार परिषदे दरम्यान पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांचे स्वागत करताना आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत-फ्रान्स भागीदारी ही केवळ धोरणात्मक नाही तर स्थिरता आणि जागतिक प्रगतीची भागीदारी आहे. २०२६ हे भारत-युरोप संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही युरोपियन युनियनसोबत इतिहासातील सर्वात मोठा व्यापार करार केला. हा करार फ्रान्ससोबतचे आमचे संबंध देखील पुढे नेईल.”

  तर मॅक्रॉन म्हणाले की, भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंध खरोखरच विशेष आणि अद्वितीय आहेत. हे संबंध विश्वास, मोकळेपणा आणि महत्त्वाकांक्षेवर आधारित आहेत. मॅक्रॉन म्हणाले, “आज आम्ही दोन्ही देशांमधील ही भागीदारी एका नवीन पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याला ‘विशेष धोरणात्मक भागीदारी’चा दर्जा दिला जाईल.”

पंतप्रधान मोदींनी फ्रान्समध्ये स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र उघडण्याची घोषणा केली. भारत आणि फ्रान्स दोन्ही प्राचीन आणि समृद्ध संस्कृती असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील लोकभवन येथे पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यातील प्रतिनिधीमंडळ पातळीवरील चर्चेचा व्हिडिओ समोर आला आहे. दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षरी झालेल्या अनेक सामंजस्य करारांवर चर्चा झाली. या बैठकीत भारत-फ्रान्स संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. दोन्ही नेत्यांनी डिजिटल तंत्रज्ञान, नवोपक्रम, विद्यार्थ्यांची गतिशीलता, संस्कृती, संरक्षण, सुरक्षा आणि हरित मार्गांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली.

११४ राफेल-हॅमर क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास मंजुरी

भारताच्या संरक्षण सिद्धतेसाठी  मंगळवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची मुंबईतील ‘लोकभवन’ येथे महत्त्वाची भेट झाली. या भेटीत दोन्ही देशांच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले असून, तब्बल ११४ राफेल फायटर जेट्स आणि शक्तिशाली हॅमर मिसाईलच्या खरेदीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आता हे राफेल विमान भारतातच तयार होणार असून, हा प्रकल्प तब्बल ३.२५ लाख कोटी रुपयांचा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top