dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

विद्युत शॉक लागून प्लंबर चा जागीच मृत्यू; खामगाव येथील शंकर नगर भागातील घटना

खामगाव :  शहरातील बर्डे प्लॉट भागातील बुडन खा छोटू खा वय 50 या प्लंबर कामगाराचा शंकर नगर भागातील एका नवीन घरामध्ये प्लंबर चे काम करत असताना विद्युत प्रवाहाचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी दुपारी  4.00 वाजे दरम्यान उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच मृतक प्लंबर बुढन खा छोटू खा याचे नातेवाईकांनी आणि परिसरातील नागरिकांनी सामान्य रुग्णालयांमध्ये एकच गर्दी केली होती. 

 कामगार बुढन खा छोटू खा हे शंकर नगर भागातील अमर कस्तुरे नामक इसमाच्या घरामध्ये प्लंबिंगचे काम करत असताना अचानक त्यांना विद्युत प्रवाहाचा स्पर्श झाला. या घटनेमध्ये प्लंबर कामगार बुढन खा छोटू खा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेवेळी घटनास्थळी घरमालक आणि इतर कोणीही कामगार उपस्थित नसल्यामुळे त्यांना वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. थोड्यावेळाने घर मालक अमर कस्तुरे हे त्या ठिकाणी आले असता त्यांना सदर घटना निदर्शनास आली. त्यांनी तातडीने कामगार बुढन खा छोटु खा यांना ऑटोमध्ये घालून जवळील सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी  भरती केले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी बर्डे प्लॉट भागात पसरतात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सामान्य रुग्णालय येथे गर्दी केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top