dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Vijayraj Shinde political reaction Buldhana : बुलढाण्यात सपकाळ वक्तव्य प्रकरणानंतर आंदोलन; प्रचारातील बॅनरवर विजयराज शिंदे यांची प्रतिक्रिया

Vijayraj Shinde political reaction Buldhana :  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात भाजपाकडून निषेध आंदोलन; प्रचारातील बॅनर संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची प्रतिक्रिया.


अभिषेक वरपे/ बुलढाणा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आदर्श घेऊन, टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढले, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. या वक्तव्यावरून, राज्यभरात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे सपकाळ यांच्या निषेधार्थ निदर्शने केली जात आहे.

बुलढाणा शहरात देखील आज १५ फेब्रुवारीला शहर भाजपाच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. भाजप जिल्हाध्यक्ष विजराज शिंदे हे देखील यावेळी सहभागी झाले होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनानंतर शिंदेंनी माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना सांगितले की, क्रूर टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचा प्रयत्न सपकाळ यांनी केला. आम्ही या घटनेचा निषेध करतोय.. इतकच नाही तर, मला हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुद्धीची कीव येते, ते नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतात. यानंतर, पालिका निवडणुकीतील प्रचार काळात आपणही आपल्या बॅनरवर टिपू सुलतानचा फोटो प्रकाशित केल्याचे पत्रकारांनी हटकले असता, कुणी आपापल्या पद्धतीने मते मागत असतात, हा फोटो कुणी छापला हे मला माहिती नाही? असे शिंदेंनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top