HSC Result : बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; कोकण विभागाचा डंका

HSC

HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल मंगळवारी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला. राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; कोकण विभागाचा डंका
बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; कोकण विभागाचा डंका

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल मंगळवारी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला. राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यंदा परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा निकाल ९३.३७ टक्के एवढा लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २.१२ टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी २०२३ चा निकाल ९१.३५ टक्के एवढा लागला होता. बारावी परीक्षेचे २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत आयोजन केले होते. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. कोकण विभागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. कोकण विभागचा निकाल ९७.५१ टक्के एवढा आहे तर सर्वाधिक कमी निकाल मुंबई ९१.९५ एवढा लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »