छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील अंबाला येथे सामुदायिक विवाह सोहळ्यातील जेवणावळीत अन्नातून विषबाधा झाल्याने २५५ रुग्ण दाखल झाले होते. त्यातील एका ८ वर्षीय बालकाचा रुग्णालयात येण्याआधीच मृत्यू झाला होता. उर्वरितांपैकी ८१ जणांना उपचाराअंती सुटी देण्यात आली असून उर्वरितांवर उपचार सुरु आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी रविवार, 27 एप्रिल रोजी कळविले आहे. सुरेश गुलाब मधे (८ वर्षे) रा. महादू खोरा असे विषबाधा होवून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

कन्नड तालुक्यातील अंबाला येथे 25 एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळ्यात 8 जोडप्यांचा विवाह झाला. या विवाह सोहळ्यात जवळपास 3 हजार लोक सहभगी झाले होते. विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींनी जेवणावळीत जेवण केल्यानंतर त्यांना जुलाब, उलटी सारखा त्रास सुरु झाल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. २५५ रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र करंजखेडा, वडनेर, औराळा व ग्रामिण रुग्णालय कन्नड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी ७१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. १५७ रुग्ण भरती आहेत. २७ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. ८१ रुग्णांवर उपचार झाल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. दरम्यान, या घटनेत सुरेश गुलाब मधे (८ वर्षे) रा. महादू खोरा या बालकाचा प्रा.आ.केंद्र करंजखेड येथे उपचारासाठी आणत असतांना उपचाराआधीच मृत्यू झाला.
या घटनेतील ३० रुग्ण हे प्राथमिक आरोग्य केंद्र बोलठाण ता. नांदगाव जि. नाशिक येथे तपासणी साठी गेले होते. या रुग्णांवर तेथेच उपचार सुरु असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना तेथेच निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. दाखल असलेल्या सर्व बाधीत रुग्णांवर करंखेडा, वडनेर, औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकामार्फत गावांमध्ये सर्व्हेक्षण, जनजागृती करण्यात येत असून उपचार व नियंत्रणात्मक कारवाई करण्यात येत आहे,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कळविले आहे.