जालना : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीनेही जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यात दहावीसाठी 32 हजार 433 आणि बारावीला 37 हजार 338 असे एकूण 69 हजार 771 विद्यार्थी यंदा परीक्षेला सामोरे जाणार आहे. तथापि, परीक्षेत कोणीही कॉपी करू नये किंवा कोणीही विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिलेल्या आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात असून, यंदा परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. परीक्षेत कॉपी करण्यास किंवा त्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नुकताच बैठकीत दिला. यंदा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) १० फेब्रुवारी ते १८ मार्च, तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी ३७ हजार ३३८ विद्यार्थी ७९ केंद्रांवर, तर दहावीच्या परीक्षेसाठी ३२ हजार ४३३ विद्यार्थी १०२ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.
परीक्षा काळात प्रत्येक केंद्रावर दोन अधिकारी व कर्मचारी असलेले बैठे पथक नियुक्त करण्यात येणार असून, जिल्हाभरात ६ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे सर्व केंद्रांवर नियमित तपासणी करून गैरप्रकार रोखले जाणार आहेत.