dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अकोला परिमंडळात २.५८ लाख स्मार्ट मीटर कार्यान्वित

वाशिम: अकोला महावितरण परिमंडळात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित २ लाख ५८ हजार ७५ स्मार्ट (टिओडी) मीटर यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आले असून, त्यामुळे वीज बिलिंग अधिक अचूक, पारदर्शक आणि तक्रारमुक्त होत आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना दर तासाला वापराची माहिती मोबाईलवर उपलब्ध होत असल्याने वीज वापरावर थेट नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.

महावितरणकडून ‘डिजिटल इंडिया’ व ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना अचूक व वेळेत बिल देण्यासाठी स्मार्ट (टिओडी) मीटर बसविण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. या मीटरद्वारे स्वयंचलित पद्धतीने मीटर वाचन होत असल्याने सरासरी वीज बिल, मीटर रिडिंग न झाल्याच्या तक्रारी तसेच चुकीच्या बिलिंगच्या समस्या पूर्णतः बंद होणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.अकोला परिमंडळातील अकोला, बुलढाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत (कृषी ग्राहक वगळून) सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना टप्प्याटप्प्याने स्मार्ट (टिओडी) मीटर बसविण्यात येत आहेत.ही कामगिरी जीनस कंपनीच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आली असून, पुढील कालावधीत उर्वरित ग्राहकांनाही स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती स्मार्ट मीटर

अकोला जिल्हा : ८०,६७१ मीटर

बुलढाणा जिल्हा : १,३०,४२५ मीटर

वाशिम जिल्हा : ४६,९७९ मीटर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top