बुलढाणा : नगर पालिका निवडणूकीसाठी मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्हयात 9 टक्के मतदान झाले. यामध्ये सिंदखेड राजा शहरात सर्वाधिक म्हणजे 10.62 टक्के मतदान झाले आहे.. अशातच मतदानाला केवळ दीड तास उलटत नाही तर बोगस मतदान करण्यासाठी सुरूवात झाली आहे.

बुलढाणा : नगर पालिका निवडणूकीसाठी मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्हयात 9 टक्के मतदान झाले. यामध्ये सिंदखेड राजा शहरात सर्वाधिक म्हणजे 10.62 टक्के मतदान झाले आहे.. अशातच मतदानाला केवळ दीड तास उलटत नाही तर बोगस मतदान करण्यासाठी सुरूवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 15 साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी ता.मोताळा येथील एका जणास उमेदवाराने मतदान केल्यानंतर पकडले आहे. त्याच्यासोबत आणखी एक जण आहे. कोथळी, इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याची माहिती आहे
