जीएमसीच्या आवारात आढळले मुंडके व पाय नसलेले नवजात स्त्री अर्भक;  पोलिसात तक्रार

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) च्या आवारात सोमवारी दुपारी एक स्त्री जातीचे नवजात मुंडके व एक हात नसलेले मृत अर्भक आढळले असून या घटनेने जीएमसीच्या आवारात एकच खळबळ उडाली. सदर अर्भक जीएमसीतील नसून बाहेरून कोणी आणून रुग्णालय प्रशासनाला बदनाम करण्याचे षडयंत्र केल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून अधिष्ठाता डॉ.मीनाक्षी गजभिये केला आहे. यावेळी स्त्री व प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ.श्यामकुमार सिरसाम देखील उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमएमसी) च्या आवारात सोमवार ता.१० रोजी दुपारी ओपीडीची गडबड सुरू असताना याच वेळेत अपघात कक्षा समोर एक नवजात मुंडके व एक हात नसलेले अर्भक या ठिकाणी दिसून आले कुत्र्यांनी लचके तोडल्याचे देखील निदर्शनास आले.घटनेची माहिती मिळताच जीएमसी प्रशासनाने तत्काळ पाहणी केली.व रुग्णालयात दाखल असणाऱ्या स्त्री रोग विभागात संपूर्ण चौकशी केली सर्वांचे बाळ हे सुरक्षित असल्याचे समजले.दरम्यान मृत अर्भक बाहेरील व्यक्तीने जीएमसीच्या आवारात आणून जीएमसीला बदनाम करण्याचा प्रकार केल्याचा दावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मीनाक्षी गजभिये यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेवून केला.सदर अर्भक शवागृहात ठेवले असून पोलीसांनी पंचनामा केल्याची माहिती आहे. 

अर्भक रुग्णालयातील नसल्याचा दावा

रुग्णालयाच्या नियमानुसार बाळाचा जन्म झाल्याबरोबर त्याच्या हातात पॅड कागद व पायाला शाई असते मात्र या अर्भकाला तसे काहीही दिसून न आल्याने हा प्रकार घरी किंवा बाहेर झाला असून स्वतःचे पाप लपवण्यासाठी जीएमसीला बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचे डीन म्हणाल्या. दरम्यान शहरात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार सुरूच असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित झाले आहे.

सीसीटीव्ही बंद:सुरक्षेचे काय?

नवजात अर्भक जीएमसीच्या पोलीस चौकीजवळ आढळले.या प्रकारामुळे जीएमसीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.याठिकाणी सीसीटीव्ही आहेत मात्र बांधकाम चालू असल्याने तूर्तास ते बंद ठेवण्यात आले.त्यामुळे हा प्रकार नेमका कोणी केला?हे अद्याप अस्पष्ट असून एफआयआर दिलेला असून पोलीस तपासात ते समोर येईल असे अधिष्ठाता म्हणाल्या.

स्वयंघोषित रुग्णसेवकांना तंबी!

सर्वोपचार रुग्णालयात स्वतःला रुग्णसेवक दाखवून रुग्णांकडून आर्थिक लुबाडणूक केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जीएमसी प्रशासनाने स्वयंघोषित रुग्णसेवकांना तंबी दिली आहे.तरी सुद्धा काहीजण रात्रीच्या वेळेस येऊन रुग्णांशी संपर्क साधत असल्याच्या तक्रारी असून त्यांचाही लवकरच बंदोबस्त करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »