खामगाव, शेगाव मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड, मतदारांना तासंतास रांगेत राहावे लागले तातकळत 

खामगाव : नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला आज दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेपासून सुरुवात झाली आहे. परंतु सुरुवातीलाच खामगाव आणि शेगाव नगरपालिकेच्या काही प्रभागांमध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने मतदारांना मतदान केंद्रासमोर रांगेमध्ये तासंतास उभे राहावे लागल्याने मतदारांमध्ये निवडणूक विभागाबाबत रोज व्यक्त होताना दिसून आले तर काही मतदार मतदान न करताच माघारी फिरल्याचेही दिसून आले.

          नगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने पूर्वसंध्येलाच म्हणजे एक डिसेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएमची चाचणी केली होती. मात्र आज दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता पासून मतदानाला सुरुवात होताच काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये खामगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ ब मधील उर्दू शाळेच्या केंद्रामध्ये सकाळी आठ वाजता दरम्यान ईव्हीएम मध्ये बिघाड आल्याने जवळपास दीड ते दोन तास मतदारांना रांगेमध्ये उभे राहून ईव्हीएम सुरळीत सुरू होण्याची वाट पहावी लागली होती. या प्रकारामुळे मतदारांमध्ये निवडणूक विभागाच्या या हलगर्जीपणाबाबत रोज व्यक्त करताना दिसून येत होते. असाच प्रकार शेगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा समोर आला असून शेगाव येथील प्रभाग क्रमांक सहा आणि आठ मध्ये सुद्धा मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्याने या ठिकाणी सुद्धा मतदारांना तासनतास रांगेमध्ये उभे राहून ईव्हीएम सुरळीत सुरू होण्याची वाट पहावी लागली होती. निवडणूक विभागाच्या या हलगर्जीपणामुळे मतदारांना कासंतास ताटकळत राहावे लागले होते. तर निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतदारांसाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आल्याचे सुद्धा दिसून आले नाही. काही वृद्ध मतदारांकडून मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नसल्याचे बोलल्या जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »