Youth dies while playing cricket in Jalna: जालन्यात क्रिकेट खेळताना हार्ट अटॅकने ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Youth dies while playing cricket in Jalna: शहरात फ्रेझर बॉईज मैदानावर ख्रिसमस क्रिकेट ट्रॉफीचे सामने खेळण्यात येत आहेत.  मालिकेतील एका सामन्या दरण्यान एका युवकाचा फलंदाजी करताना मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला.  विजय पटेल असं मृतक खेळाडूचे नाव असून तो नालासोपारा मुंबई येथील रहिवासी होता.

Youth dies while playing cricket in Jalna

जालना :  शहरात फ्रेझर बॉईज मैदानावर ख्रिसमस क्रिकेट ट्रॉफीचे सामने खेळण्यात येत आहेत.  मालिकेतील एका सामन्या दरण्यान एका युवकाचा फलंदाजी करताना मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला.  विजय पटेल असं मृतक खेळाडूचे नाव असून तो नालासोपारा मुंबई येथील रहिवासी होता. हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार,  जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावर ख्रिसमस क्रिकेट ट्रॉफीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी क्रिकेटचा सामना सुरू असताना फलंदाजी करणाऱ्या विजय पटेल या फलंदाजाला भोवळ आणि तो जमिनीवर कोसळला. दरम्यान, त्याला इतर खेळाडूंनी डॉक्टरांकडे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना सोमवार, 30 डिसेंबर रोजी दुपारी क्रिकेट सामना सुरू असताना घडली. पटेल याने षटकार मारला आणि त्यानंतर जमिनीवर कोसळला.
दरम्यान, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
क्रिकेट खेळत असताना हृदय विकाराचा झटक्याने पटेल याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. विजय पटेल हा नालासोपारा मुंबई येथील रहिवाशी असून क्रिकेट सामना खेळण्यासाठी तो जालना येथे आला होता. ट्रॉफी सामन्यांमध्ये हा खेळाडू खेळत असताना याला अचानक हार्ट अटॅक आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या खेळाडूचा मृत्यू नेमका कशाने झाला याची अधिकृत माहिती आली नसली तरी हार्टअटॅकमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »