बुलढाणा: ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून पुरोगामी संघटना आणि आ. गायकवाड यांच्यात संघर्ष उफाळत चालला आहे. काल बुलढाण्यात भारतीय कम्युनिस्ट आणि इतर डाव्या संघटनांकडून झालेले गायकवाड यांच्या विरुद्ध आंदोलन चिरडल्या गेल्याचा आरोप आहे.

युवक काँग्रेसकडून शिवाजी कोण होता? पुस्तकाचे वाचन
बुलढाणा: ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून पुरोगामी संघटना आणि आ. गायकवाड यांच्यात संघर्ष उफाळत चालला आहे. काल बुलढाण्यात भारतीय कम्युनिस्ट आणि इतर डाव्या संघटनांकडून झालेले गायकवाड यांच्या विरुद्ध आंदोलन चिरडल्या गेल्याचा आरोप आहे.

दरम्यान, आज युवक काँग्रेसच्या वतीने बुलढाण्यातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर शिवाजी कोण होता? पुस्तकाचे वाचन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि आमदार गायकवाड समर्थक आमने-सामने आल्याच पाहायला मिळालं. दोघांकडूनही प्रचंड घोषणाबाजी झाली, परंतु पोलिसांच्या मध्यस्थीतीने संघर्ष टळला. याप्रसंगी मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.