बुलढाणा : तानाजी नगर येथील रहिवासी विनोद मिलींद वाठोरे वय 32 याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 25 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.

बुलढाणा : तानाजी नगर येथील रहिवासी विनोद मिलींद वाठोरे वय 32 याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 25 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.
प्राप्त माहितीनुसार विनोद हा 24 ऑक्टोबरच्या रात्री अचानक घरातून निधून गेला होता. त्यामुळे कुटूंबियांनी त्याचा शोध सुरू केला असता बिरसिंगपूर येथील त्यांच्या स्वत: शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचे प्रेत आढळून आले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व बराचमोठा आप्त परिवार आहे. त्याच्या मृत्यू मागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.