भरधाव वाहनाच्या धडकेत दांम्पत्याचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर :  भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या दांम्पत्याचा दुर्देवी मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. प्रा. डॉ. राम माने, रा. पडेगाव परिसर व त्यांच्या पत्नीचा या अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रा. राम माने व त्यांच्या पत्नी शनिवारी सायंकाळी पडेगाव परिसरात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी मिटमिट्याकडून भरधाव वेगाने छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी होवून प्रा. माने व त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अपघाताची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून गंभीर जखमी झालेल्या प्रा. राम माने व त्यांच्या पत्नीस उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »