जालना : बंजारा समाजाला एसटी आरक्षण लागू करावे यासह अन्य मागण्यांसाठी नऊ दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेले विजय चव्हाण यांनी शनिवारी ( ता.25) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा आणि समाज बांधवांच्या संमती नंतर उपोषण स्थगित केले. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंढे, संजय राठोड,आ.अर्जुन खोतकर, युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर यांच्या सह समाजबांधवांची उपस्थिती होती.तथापि पालकमंत्री पंकजाताई मुंढे यांनी मान्य केलेल्या मागण्यांसाठी एक महिना तर एसटी आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत दोन महिन्यांची मुदत विजय चव्हाण यांनी शासनास दिली.

जालना : बंजारा समाजाला एसटी आरक्षण लागू करावे यासह अन्य मागण्यांसाठी नऊ दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेले विजय चव्हाण यांनी शनिवारी ( ता.25) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा आणि समाज बांधवांच्या संमती नंतर उपोषण स्थगित केले. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंढे, संजय राठोड,आ.अर्जुन खोतकर, युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर यांच्या सह समाजबांधवांची उपस्थिती होती.तथापि पालकमंत्री पंकजाताई मुंढे यांनी मान्य केलेल्या मागण्यांसाठी एक महिना तर एसटी आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत दोन महिन्यांची मुदत विजय चव्हाण यांनी शासनास दिली.
बंजारा समाजासाठी हैदराबाद गॅझेट, सीपी बेरार आयोगाची अंमलबजावणी करावी, आरक्षण लढाईत बलिदान दिलेल्या समाज बांधवांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत देऊन शासकीय नोकरीत समाविष्ट करावे यासह अन्य मागण्यांसाठी विजय चव्हाण यांनी 17 ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते.दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती.शासन ,प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे बंजारा समाज बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली .शनिवारी रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.त्याअनुषंगाने आज उपोषण स्थळी महिलांसह समाजबांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. महिलांची भाषणे ऐकून भावनिक झालेले विजय चव्हाण यांची शुगर कमी झाली तर बीपी वाढला होता. डॉक्टरांनी तातडीने उपचार करून सलाईन लावले.त्यांच्या प्रकृतीमुळे वातावरण काही काळ गंभीर बनले होते उपस्थित समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत शिष्टमंडळास लवकर पाचरण
करण्याचा आग्रह धरला.उध्दव पवार, संदीप जाधव यांनी समाज बांधवांना धीर देत शांततेचे आवाहन केले.
दरम्यान आ.अर्जुन खोतकर यांनी दोन दिवसांपूर्वी भेट देऊन शासनाचे शिष्टमंडळ घेऊन येणार असल्याची हमी दिली होती. त्या अनुषंगाने आज दुपारी 01.13 वा. पालकमंत्री पंकजा मुंढे, संजय राठोड आणि स्वतः आ. अर्जुन खोतकर हे उपोषण स्थळी दाखल झाले.विजय चव्हाण यांच्याशी तब्बल दीड तास शिष्टमंडळाने चर्चा करून चव्हाण यांनी उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न केला. पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी उपोषणावर ठाम असलेले विजय चव्हाण यांना एसटी आरक्षण अंमलबजावणी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय असून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विजय चव्हाण यांची भ्रमणध्वनी वरून चर्चा घडवून आणली.समाजाचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेसाठी निमंत्रण दिले.सेनापती जीवंत राहिला पाहिजे,आपण स्वतः तुमच्या सोबत असल्याचे सांगून महाराष्ट्र शासनाच्या अधिकारातील मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वचन पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी दिले.
संजय राठोड यांनी एसटी आरक्षणाबाबत कायदेशीर बाबी तपासून सामाजिक न्याय विभाग, बहुजन कल्याण विभाग, यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढला जाईल असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या 2-3 दिवसांत समाजातील अभ्यासकांच्या शिष्टमंडळासह आपण चर्चेसाठी यावे पालकमंत्री पंकजा मुंढे ,आ. अर्जुन खोतकर हे आपल्या सोबत असल्याचे ना.राठोड यांनी सांगितले.
शिष्टमंडळासोबत सखोल चर्चेअंती समाज बांधवांचा संमती नंतर अखेर विजय चव्हाण यांनी उपोषण स्थगित केले. अविनाश चव्हाण यांनी आभार मानले.यावेळी महिला व समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या मागण्या पूर्ण करून घेणार : पालकमंत्री पंकजा मुंढे
शिष्टमंडळास समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनाचे अवलोकन करून पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी कर्नाटकच्या धर्तीवर तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन करणे, आदिवासी च्या धर्तीवर स्वतंत्र तांडा घरकुल योजना,
व्ही. जे .एन .टी.प्रवर्गातील मुला- मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात आश्रम शाळा,शासकीय वस्तीगृह
व्ही.जे.एन.टी.प्रवर्गात होत असलेली बोगस घुसखोरींबाबत जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करून चौकशी करणार
या मागण्या संबंधित मंत्री, मंत्रालयाकडे पाठपुरावा करून पूर्ण करण्याचे वचन पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी यावेळी दिले.
आ. खोतकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण
दोन दिवसांपूर्वी आ. अर्जुन खोतकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन शासनाचे शिष्टमंडळ घेऊन येणार असल्याची हमी दिली होती. त्या अनुषंगाने मागील दोन दिवसांपासून आ.खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना.संजय राठोड यांच्याशी चर्चा करून विजय चव्हाण यांच्या उपोषणाबाबत माहिती देऊन समाजबांधवांच्या तीव्र भावनांची जाणीव करून दिली. शुक्रवार, 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आ.खोतकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत विजय चव्हाण यांची भ्रमणध्वनी वरून चर्चा घडवून आणली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सल्ल्यावरून विजय चव्हाण यांनी सलाईन घेण्यास सुरुवात केली. शनिवारी आ.खोतकर हे पालकमंत्री पंकजा मुंढे आणि मंत्री संजय राठोड यांना उपोषण स्थळी घेऊन आले.उपोषणकर्ते चव्हाण आणि शासनाचे शिष्टमंडळ यांच्यात मध्यस्थी करून उपोषण स्थगित करण्यासाठी आ.अर्जुन खोतकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
