Young woman killed in Accident : भरधाव महिंद्रा पिकअपने स्कुटीवरून चाललेल्या मायलेकींना जोरदार धडक दिली. यात लेकीचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेदरम्यान बुलढाणा – चिखली रोडवरील त्रिशरण चौकात घडली.
बुलढाणा : भरधाव महिंद्रा पिकअपने स्कुटीवरून चाललेल्या मायलेकींना जोरदार धडक दिली. यात लेकीचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेदरम्यान बुलढाणा – चिखली रोडवरील त्रिशरण चौकात घडली. या अपघाताला कारणीभू असलेल्या पिकअप वाहनचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
बुलढाणा तालुक्यातील साखळी येथील मूळचे रहविासी छाया संदिप चौधरी वय 55 आणि मुलगी स्नेहल चौधरी वय 24 ह्या दोघी मायलेकी पोस्ट ऑफीसच्या कामासाठी बुलढाणा येथे येत असताना त्यांना महिंद्रा पिकअप क्रमांक एमएच 28 ए.बी.1188 ने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटी चालवित असलेली स्नेहल दूर फेकली गेली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलीसांनी आरोपी चालक सतिष भास्कर बाहेकर याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.