Class 12th exams from tomorrow: उद्यापासून बारावीची परीक्षा: विद्यार्थ्यांनो, ऑल द बेस्ट; 15 लाखांवर विद्यार्थ्यांची नोंदणी

Class 12th exams from tomorrow

Class 12th exams from tomorrow : बारावीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

Class 12th exams from tomorrow

पुणे : बारावीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परीक्षा दहा दिवस आधी घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या. 10 दिवस आधी परीक्षा घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. निकालही लवकर जाहीर करणार आहोत, 15 मेपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे शरद गोसावी यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले आणि 6 लाख 94 हजार 352 मुली आहेत. तर 37 ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत. या पैकी 7 लाख 68 हजार 967 विद्यार्थी विज्ञान शाखेची परीक्षा देणार आहेत. 3 लाख 80 हजार 410 विद्यार्थी कला शाखेची तर 3 लाख 19 हजार 439 विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देणार आहेत.

गैरप्रकार आढळल्यास होणार गुन्हा दाखल

सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढवून दिले जाणार आहेत, या आधी पेपरच्या आधी 10 मिनिटं वाढवून दिले जात होते, परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे यांच्यावर देखील पात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी ठेवली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाणार आहे. प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएससह लाइव्ह ट्रॅकिंग, व्हिडीओ चित्रीकरणंही केलं जाणार असल्याची माहिती गोसावी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »