छत्रपती संभाजीनगर : सर्वत्र माफियाराज पसरले असून दहावी – बारावी परीक्षा दरम्यान आमच्याही जीवाला संतोष देशमुख प्रमाणे धोका होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा काळात आम्हालाही एक महिना हत्यारबंद सुरक्षा द्याल का ? असा अजब सवाल विभागीय शिक्षण मंडळाच्या भर बैठकीत शिक्षकांनी अधिकाऱ्यांना केला.

दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सरस्वती भुवन महाविद्यालयात शिक्षण मंडळातर्फे बैठकीचे आयोजन केले होते. विभागीय सचिव डॉ. वैशाली जामदार, सहसचिव प्रियाराणी पाटील, सहायक सचिव डी. एम. पानसरे यांची यावेळी उपस्थिती होती. या बैठकीत एक शिक्षक म्हणाले, अनेक जिल्ह्यांत कॉपीमाफियांची दहशत असते. त्यामुळे आम्हाला सुरक्षा पुरवा, हे एकून सारेच स्तब्ध झाले. दरम्यान, दुसऱ्या बैठकीत जि.प. सीईओ विकास मीना यांनी सांगितले की, शाळा कोणत्याही नेत्याची असो, कॉपी, गैरप्रकार करणाऱ्यांची गय करणार नाही. एकीकडे अधिकाऱ्यांकडून राजकारण्यांच्या संस्थांमध्ये कॉपीचा प्रकार आढळून आला तर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात येत आहे. तर दुसरीकडे परीक्षा दरम्यान जीवाला धोका होऊ शकतो अशी भीती शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.
कॉपी सेंटरवर कधी कारवाई करणार ?
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात प्रवेश घ्या आणि थेट परीक्षेला या आशा तत्वावर अनेक महाविद्यालये सुरू आहेत. विशेष म्हणजे ही सर्व महाविद्यालये राजकीय नेत्यांशी संबंधीत असून त्यात प्रवेश घेतलेले विद्याथी शहरातील मोठ्या कोचिंग सेंटरमध्ये पैसे माजून शिक्षण घेतात. शाळा कोणत्याही नेत्याची असो, कॉपी, गैरप्रकार करणाऱ्यांची गय करणार नाही असा इशारा देणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना या महाविद्यालयाचा आढावा घेणार का ? आणि अशा कॉपी सेंटरवर कधी कारवाई करणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.