compensation for damage in Mehkar : मेहकर तालुक्यातील नुकसान भरपाईसाठी अधिवेशनात विशेष पॅकेज मागणार : आ. सिद्धार्थ खरात 

compensation for damage in Mehkar

compensation for damage in Mehkar : यंदा जून महिन्याच्या शेवटीच मेहकर तालुक्यात विक्रमी पाऊस झालाआहे. हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने पेरणी पूर्ण केलेल्या शेतकरे हवालदिल झाले असून, शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. यामुळे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अधिवेशनात विशेष पॅकेज मागणार असल्याची माहीती मेहकर विधानसभा मतदार संघाचे आ. सिद्धार्थ खरात यांनी दिली.

compensation for damage in Mehkar

मेहकर : यंदा जून महिन्याच्या शेवटीच मेहकर तालुक्यात विक्रमी पाऊस झालाआहे. हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने पेरणी पूर्ण केलेल्या शेतकरे हवालदिल झाले असून, शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. यामुळे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अधिवेशनात विशेष पॅकेज मागणार असल्याची माहीती मेहकर विधानसभा मतदार संघाचे आ. सिद्धार्थ खरात यांनी दिली.

मेहकर तालुक्यात गत 24 तासात दोनशे मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती आहे. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आ. सिद्धार्थ खरात यांनी अधिकाऱ्यांना सोबत बाधित गावांचा दौरा केला व नुकसानीची पाहणी केली. यंदा जून महिन्यातच अनेक वर्षातील विक्रमी पाऊस झाला. पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, संबंधित विभागाला पंचनाम्याबाबत सूचना दिल्या आहेत. पाहणी दौऱ्यात तहसीलदार निलेश मडके, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, प्रवीण देशमुख, गटविकास अधिकारी डी बी खरात, पुरवठा निरीक्षक एन बी.बोराडे,तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे ,मंडळ अधिकारी नितीन बोरकर सह अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सोबतच उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, शहरप्रमुख किशोर गारोळे, युवा सेना शहर अधिकारी ऋषी जगताप ,काँग्रेसचे विधानसभा नेते अनंतराव वानखेडे ,युवा सेना आदी उपस्थित होते.

पुलाच्या कामाचे साहित्य कंत्राटदराने टाकून दिल्याचा आरोप

जागतिक बँकेचे जे प्रोजेक्ट सुरू आहे त्यात जी पुलाची कामे सुरू आहेत ते सर्व मटरेल संबंधित कंत्राटदाराने नदीतच टाकून दिल्याने मोठ्या प्रमाणावर पूर येऊन नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टीला संबंधित कंत्राटदार व संबंधित विभाग जबाबदार असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. येत्या 29 तारखेला सर्व विभागाची आढावा बैठक घेऊन पुन्हा एकदा नुकसानी बाबतचा सर्व अहवाल तयार होणार आहे. तर ३० तारखेपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मेहकर व लोणार साठी नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »