मलकापूर : शहरातील लक्ष्मी नगर मधील घटना मलकापूर शहरालागत असलेल्या लक्ष्मी नगर मधील एका किशन सिलेंडरच्या व्यावसायिक दुकानांमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर स्वरूपाने जखमी झाल्याची घटना 23 मार्च रोजी दुपारी उघडकीस आली.

मलकापूर शहरातील लक्ष्मी नगर भागामधील रहिवाशी अनंता अशोक देशमुख 45 यांचा शिवराज फायर सर्व्हिसेस नावाची ऑक्सिजन सिलेंडर डिलिव्हरीचा व्यवसाय आहे. 23 मार्च रोजी ऑक्सिजन सिलेंडर डिलिव्हरी करण्याकरिता ऑटोक क्रमांक एम एच 28 टी 3401 मध्ये भरत असताना अचानक एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की एजन्सी चालक अनंता देशमुख यांचा एक पाय शरीरापासून उखडून पडला. या भयंकर अपघातामध्ये अनंता देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला त्यांचा पुतण्या गणेश पंडितराव देशमुख 22 हा किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने परिसरातील नागरिकांनी दुकानाजवळ एकच गर्दी केली होती. ऑक्सीजन गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसरात मोठा आवाज होऊन एकच खळबळ उडाली होती. काहीकाळ परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत नागरिकांनी मलकापूर पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी व मृतक दोघांना मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. यावेळी स्थानिकांनी सुद्धा बचाव कार्यासाठी भरपूर प्रयत्न केले.