पाणी टंचाई : बाभुळगाव खुर्द ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडा मोर्चा

वैजापूर : पाणी टंचाई मुळे त्रस्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर गुरुवारी सकाळी हंडा मोर्चा काढला.तसेच नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी.अशी मागणी महिलांनी केली. बाभुळगाव खुर्द गावात काही दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे.तसेच नाल्यांची स्वच्छता देखील झाली नाही. त्यामुळे महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून  निदर्शने केली.

ग्रामपंचायतीकडे  निधी नसेल तर आम्ही वर्गणी देऊ” अशा आशयाचे फलक यावेळी महिलांकडून झळकावण्यात आले.  ७ दिवसांत  पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. तसेच नाल्यांची स्वच्छता झाली नाही. तर गावकऱ्यांच्या वतीने  आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा यावेळी देण्यात आला. सरपंच आण्णासाहेब चौधरी यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेऊन मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंगल तुपे, तुळसाबाई पोपळघट, अर्चना कुलकर्णी, प्रकाश तुपे, विशाल शिंदे, विशाल तुपे, समाधान पवार, मुकुंद उपाध्याय, सचिन शेलार, अनिकेत दीवेकर, विशाल पवार आदींसह महिलांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »