नागापुर : कन्नड तालुक्यातील साखरवेल ते करंजखेड या रस्त्याची चाळणी झाली असून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग व घाटशेंद्रा येथील कृष्णा सहाने यांनी ग्रामस्थांसह उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

नागापुर : कन्नड तालुक्यातील साखरवेल ते करंजखेड या रस्त्याची चाळणी झाली असून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग व घाटशेंद्रा येथील कृष्णा सहाने यांनी ग्रामस्थांसह उपोषणाचे हत्यार उपसले आहे. साखरवेल ते करंजखेड रस्त्याच्या कामासाठी दोघांनी 25 एप्रिलपासून करंजखेड फाटा येथे उपोषणास बसले आहेत.
कन्नड तालुक्यातील साखरवेल ते करंजखेड हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 11 असून या रस्त्याची चाळणी झाली आहे. तसेच रस्त्यावर मोठ – मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरुन प्रवास करतांना वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागते. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने वाहनधारकांना पाठीचे व मणक्याचे आजार जडले आहेत. तसेच वाहनांचे मेंन्टनसही वाढले आहे वारंवार मागणी करुनही प्रशासन व अधिकारी या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष द्यायला तयार नाही. साखरवेल ते करंजखेड या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग व घाटशेंद्रा येथील कृष्णा सहाने यांनी करंजखेड फाटा येथे उपोषण सुरु केले आहे. माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश गाडेकर, नागापूरचे उपसरपंच जलील पठाण, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष नवाब शेख, कलीम पेंटर, राहुल चौतमल, अनिल माळी, मंगेश तायडे, वजीरखा पठाण, अनिल सपकाळ आदिंनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दिला आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.