Vairagarh Crime News : कमी दरात सोने खरेदीचा मोह नडला;  हॉटेल व्यावसायीकास 15 लाखाने गंडविले 

Vairagarh Crime News

Vairagarh Crime News : पालघर येथील हॉटेल व्यावसायिकाला सोने विक्रीच्या नावाखाली तिघा अज्ञातांनी गंडविले. ही खळबळजनक घटना अमडापूर हद्दीतील वैरागड शिवारात 26 ऑक्टोबर रोजी घडली.

Vairagarh Crime News
Crime

उदयनगर : पालघर येथील हॉटेल व्यावसायिकाला सोने विक्रीच्या नावाखाली तिघा अज्ञातांनी गंडविले. ही खळबळजनक घटना अमडापूर हद्दीतील वैरागड शिवारात 26 ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. याअनुषंगाने नवीन वस्तु खरेदी करण्यास सुरुवात झाली असून, दिवाळीच्या पर्वावर सोने, चांदी खरेदी करण्याची जुनी प्रथा आहे. इतकेच नाही तर याकाळात सोने, चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे अनेक धनाढय व्यावसायिकांना सोने खरेदी करण्याचा मोह आवरता येत नाही, मात्र अशात व्यवहार करत असताना सावधगिरी बाळगली तर ठीक अन्यथा, लाखो रुपयांचा गंडा बसल्या शिवाय राहणार नाही. असाच प्रकार या घटनेने समोर आला आहे.
याप्रकरणातील तक्रारदार गुरुनाथ शंकर दळवी (45 वर्ष) हे हॉटेल व्यावसायिक आहेत. पालगर येथे हॉटेल चालविण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून ते करीत आहेत. नेहमीप्रमाणे कामात असताना त्यांना तीन दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आपण ओळखीचे आहोत असे भासवत समोरचा व्यक्ति त्यांच्याशी बोलत होता. हळूहळू त्या अज्ञात व्यक्तीने गुरुनाथ दळवी यांना विश्वासात घेतले अन् तुम्हाला कमी दरात सोने करायचे का ? असा प्रश्न विचारला कमी दराने महागडी मोल्यवान वस्तु मिळत असेल तर कुठलाही व्यापारी, व्यवसायिक तयारी दाखवणारच, याप्रकारे दळवी यांनी ‘त्या’ अज्ञात व्यक्तीचा प्रस्ताव स्वीकारला. यानंतरच्या दिवसांत गुरुनाथ दळवी यांच्या भाचाने त्या अज्ञात व्यक्तीची भेट घेतली. सोन्याची पडताळणी ही केली. यावेळी ‘त्या ठगबाज आरोपीने खरे सोने दाखविले. त्यानंतर दळवी यांचा विश्वास अधिक बसला. 15 लाख रुपयांचे सोने खरेदी करण्याचे ठरले. यानुसार, ते थेट पालगर येथून चिखली तालुक्यातील अमडापूर येथे दाखल झाले होते. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास वैरागड शिवारात संबधित व्यक्तिकडून सोने खरेदी करण्यासाठी ते आले. यावेळी एका शेतात हा सगळा व्यवहार झाल्याचे समजते. उपरोक्त ठिकाणी तीन अज्ञात ठगबाज आरोपी सोने विक्रीसाठी आले. एका दगिन्याची चाचपणी करून पुनःहा त्यांचा विश्वास बसला आणि चक्क 15 लाख रुपयांचे कथित सोने तक्रारदार दळवी यांनी खरेदी केले. मात्र, खरेदी केलेले सोने बनावट असल्याचे लक्षात येत नाही, तोच तिघे आरोपी फरार झाले होते. त्यानंतर जवळच असलेले अमडापूर पोलीस स्टेशन गाठत त्यांनी हकीकत कथन केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सोने नव्हे धातूच्या गिन्या

खऱ्या सोन्याऐवजी प्रत्येकी एक ग्रॅम वजनाच्या असे एकूण दीड किलो वजन असलेल्या पिवळ्या रंगाच्या धातूच्या गिन्या देऊन तक्रारदार दळवी यांची 15 लाख रुपयांनी फसवणूक झाली असे तक्रारीत नमूद आहे.  कुठल्याही अज्ञात व्यक्तिवर विश्वास न ठेवता व्यवहार करावे, याघटनेचा सविस्तर तपास सुरू असून, लवकरच आरोपी समोर येतील.
– निखील निर्मळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक तपास अधिकारी, अमडापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »