नशेसाठी कोडीन सिरपचा वापर; 18 हजार 360 बाटल्या जप्त; टोळीकडून 77 लाख 44 हजाराचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर :  नशेसाठी कोडीन सिरप या औषधीचा पुरवठा करणारे गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यातील नेटवर्क गुन्हेशाखा पोलिसांनी उघडकीस आणले आहे. पोलिसांनी टोळीच्या ताब्यातून 18 हजार 360 कोडीन सिरपच्या बाटल्या, एक कार, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 77 लाख 44 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी बुधवार, 15 ऑक्टेाबर रोजी पत्रकार परिषदेत दिली. तसेच पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेश सिताराम रावत (५४ वर्ष), रा. श्रीयांशनाथ अपार्टमेंट, भंडारी मार्ग, इंदौर, मध्यप्रदेश, आणि धमेंद्र उर्फ गोपाल खेमचंद प्रजापती (३२ वर्ष), रा. स्नेहदिप सोसायटी, वेजलपूर, अहमदाबाद, गुजरात अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कोडीन सिरपचा साठा करुन पुरवठा करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. गेल्या काही वर्षापासून शहरात नशेखोरीचे प्रमाण वाढले असून नशेसाठी तरुणाईकडून कोडीन सिरपचा वापर केला जातो, असे निदर्शनास आल्यावर पोलिसांनी गेल्या महिन्यात 12 सप्टेंबर रोजी वाळुज पोलिस ठाण्यांतर्गत कोडीन घटक असलेल्या औषधीच्या 2 हजार 504 बाटल्या व इतर मुद्देमाल असा एकूण 12 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणात 41 आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी शहरात नशेची औषधी विक्रीसाठी आलेले कल्पेश अग्रवाल (धुळे), सय्यद नबी सय्यद लाल (वाळुज) या दोघांना अटक केली तर ज्ञानेश्वर यादव उर्फ माऊली (जयभवानीनगर) हा पसार झाला. 

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक आयुक्त संपत शिंदे, गुन्हेशाखेचे निरीक्षक संभाजी पवार, सहाय्यक निरीक्षक रविकांत गच्छे, ज्ञानेश्वर अवघड, संजय बहुरे, विनायक शेळके, उपनिरीक्षक संदिप काळे, अर्जुन कदम, सहाय्यक फौजदार दिलीप मोदी, पोलिस अंमलदार प्रकाश गायकवाड, अशरफ सय्यद, अमोल शिंदे, नवाब शेख आणि सागर पांढरे आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »