dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

क्षुल्लक कारणावरून शिक्षकावर चाकू हल्ला; दोघांविरोधात गुन्हा दाखल 

देऊळगाव राजा : घरासमोरील जागेत वाहन उभे केल्याने चालकाला विचारणा करण्यासाठी गेलेल्या शिक्षकाशी वाद घालून दोघांनी चाकूने वार करत जखमी केले. ही घटना देऊळगाव राजा शहरातील प्रभाग दोन मध्ये 28 मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या दोन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

   जखमी शिक्षक शेख रमीज शेख नजीर (३५ वर्ष) यांनी  दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी दुपारी 12 ते 12:30 वाजेदरम्यान त्यांच्या घरासमोरील जागेत कुणीतरी चारचाकी मालवाहू वाहन उभे केले.  यामुळे, ते विचारणा करण्यासाठी केले असता आरोपी शेख बिलाल शेख नयुम याने शिवीगाळ केली. एवढेच नाही तर, त्याच्या  जवळील चाकूने छातीवर वार करून त्याने जखमी केले. दरम्यान, त्याचा सहकारी आरोपी शेख नयुम शेख इस्माईल याने ‘ही जागा आमची आहे, तुम्ही पुन्हा इथे आला तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी दिली.  याप्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रकरणाचा पूढील तपास हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख  हे करित असून, प्रथम अहवाल पोहेकॉ गणेश जायभाये नोंदविला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top