विना परवाना सागवन पकडले; दीड लाखाचा मुद्देमाल जप्त, वनविभागाची कारवाई

बुलडाणा :  तालुक्यातील देऊळघाट येथे 4 फेब्रुवारी रोजी वन विभागाच्या पथकाने धाड टाकून विना परवानगी कापलेले सागवन व रंधा मशीन असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

बुलडाणा :  तालुक्यातील देऊळघाट येथे 4 फेब्रुवारी रोजी वन विभागाच्या पथकाने धाड टाकून विना परवानगी कापलेले सागवन व रंधा मशीन असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

अनेक ठिकाणी फर्निचरची दुकाने सुरू असून काही जण अवैधपणे सागवन फर्निचर तयार करून विक्री करीत आहेत.  डीएफओ सरोज गवस यांना माहिती मिळाली की,  देऊळघाट परिसरातील बिरसिंगपूर रोडवर रमेश नाना बोराळे यांनी अवैध सागवन लाकडाची साठवणूक करून फर्निचर दुकानाजवळ लपवून ठेवले आहे. आरएफओ सुनील वाकोडे यांनी तत्काळ घटनास्थळी पथक रवाना  केले. त्याठिकाणावरुन एक रंधा मशीन, गोल सागवन लाकडे, चौरस लाकडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुकान मालक रमेश बोराळेविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वनपाल प्रदीप मुंढे, वनरक्षक एस. बी. कराड, वनरक्षक समाधान झोटे, चालक संदीप मडावी, प्रवीण सोनवणे, पवन वाघ, दीपक सोनवणे, रवींद्र तायडे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील सागवान तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »