छत्रपती संभाजीनगर : गावठी बनावटीचे मॅग्जिन पिस्टल वापरणाऱ्या दोन जणांना गस्तीवरील सिडको पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई सोमवार, 12 जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास सिडको एन-7 परिसरातील जिगीशा इंग्लिश स्कूल ते सनी हॉटेल रोडवर करण्यात आली. गावठी बनावटीचे मॅग्जिन असलेले पिस्टल बाळगणाऱ्यांच्या ताब्यातून पोलिसांनी चार लाख रुपये किंमतीची एक कार जप्त केली असल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतूल येरमे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविनाथ रामकृष्ण बर्डे (26 वर्ष), रा. हरिओमनगर, सईदा कॉलनी, जटवाडा रोड, शुभम छगन सलामपुरे (25 वर्ष), रा. पहाडसिंगपुरा, बीबी का मकबरा परिसर असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची नावे आहेत. सिडको पोलिस ठाण्याच्या डायल 112 पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अनिल नाणेकर, एकनाथ चव्हाण, पोलिस अंमलदार विनोद खरात, उत्तम जाधव हे सिडको एन-7 परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास गस्तीवर होते त्यावेळी जिगीशा इंग्लिश स्कूल ते सनी हॉटेल रोडवर कार क्रमांक (एमएच-14-ईयु-6062) मध्ये रविनाथ बर्डे व शुभम सलामपुरे हे दोघे संशयास्पदरित्या बसलेले आढळून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एक गावठी बनावटीचे मॅग्जिन असलेले पिस्टल मिळून आले. याप्रकरणी पोलिस अंमलदार विनोद खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दोघांविरुध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलिस आयुक्त मनोज पगारे, सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतूल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.