dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जगभरात धार्मिक कट्टरतावाद वाढतोय : ॲड. पुरूषोत्तम खेडेकर : माँ साहेब जिजाऊ जन्मोत्सव सोहळा थाटात

सिंदखेडराजा :  आज जग उजव्या विचारसरणीकडे जात आहे. म्हणून आपली जबाबदारी जास्तीत जास्त वाढत आहे. आपण सर्व कितीही एकोपा वाढवत असलो तरीही आता केवळ देशातच नाही तर जगभरात धार्मिक कट्टरतावाद वाढत आहे. सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक दहशतवाद कमी कसा करता येईल, यावर काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले.

राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त 12 जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून ॲड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. ॲड. पुरूषोत्तम खेडेकर म्हणाले, 35 वर्षापूर्वी आपण आणि आपलं हे गाव एक होतो. काही अडीअडचणींमुळे आपण गावाबाहेर जिजाऊ सृष्टीसाठी वेगळी जागा घेतली. तीथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा करतो. पण काही कारणामुळे आपण गावापासून दुरावलो किंवा गाव आपल्यापासून दुरावले आहे. त्यामुळे जग जोडत असताना आपल्याला सर्वांना जाणिवपूर्वक ठरवून प्रयत्न करायचा आहे. गावात सर्व ठिकाणी फिरून कुणाचे काही गैरसमज असतील ते दूर करून पुढे जायचे आहे, असेही ॲड. पुरूषोत्तम खेडेकर यावेळी म्हणाले.

मराठा सेवा संघाची नव्याने बांधणी

मराठा सेवा संघाची नव्याने बांधणी करण्याबाबत ॲड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी भाष्य केले. त्यासाठी मराठा सेवा संघाच्या नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर करा. नव्याने बांधणी करण्यावर विचार करा. त्यासाठी आपण इथे येऊ आणि बैठका घेऊ. फक्त 12 जानेवारीलाच न येता वर्षभरात पाच ते सहा वेळा इथे आले पाहिजे. मराठा सेवा संघानी एकत्र येऊन नवीन काही तरी केले पाहिजे. त्यसाठी व्याख्यान ठेवले पाहिजे. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी संगणक शिका, स्पोकन इंग्लीश क्लासेस लावा. काही तरी नवीन शिकण्याचे आवाहन त्यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top