खामगाव : शहरापासून जवळच असलेल्या घाटपूरी शिवारातील चोपडे यांच्या मळ्यात पुन्हा एकदा दोन बिबट आढळून आले आहे. शेतकऱ्याने शेतामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅरेऱ्यात दोन मोठे बिबट शेतात मुक्त संचार करतांना कैद झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खामगाव : शहरापासून जवळच असलेल्या घाटपूरी शिवारातील चोपडे यांच्या मळ्यात पुन्हा एकदा दोन बिबट आढळून आले आहे. शेतकऱ्याने शेतामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅरेऱ्यात दोन मोठे बिबट शेतात मुक्त संचार करतांना कैद झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने वन विभागाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. बिबट्यांच्या वावरमुळे शेतमजूरही शेतात कामासाठी येत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
मागील 27 फेब्रुवारी रोजी शहराला लागून असलेल्या घाटपूरी शिवारातील चोपडे यांच्या मळ्यातील मक्याच्या शेतातमध्ये बिबट आढळून आले होते. यावेळी वनविभागाने दिवसभर राबविलेल्या रेस्क्यू ऑपरेशनलाही यश आले नाही. सदर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरेसुध्दा लावले होते. मात्र बिबट्याने वनविभगाला चकमा देत तेथून पळ काढले. त्यानंतर खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. सदर कॅमेऱ्यात 16 मार्च रोजी दोन बिबटे शेतात मुक्त संचार करतांना आढळून आले. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली. सदर बिबट नेहमीच शेतात येत असतात त्यामुळे शेतात काम करण्यापासून शेतकऱ्यांना आणि शेतमजूरांना भिती जाणवत असल्याने शेतात कोणीही काम करण्यासाठी येत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
शेताजवळच मानवी वस्ती
शेताला लागूनच नागरिकांची वस्ती आहे. सदर बिबट शेतामधून वस्तीत शिरून नागरिकांवर हल्ला करण्याची दाट भिती याठिकाणी शेतकरी आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वन विभाग, महसूल विभाग आणि पोलीस विभागाने याकडे जातीने लक्ष देवून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
