बुलढाणा : राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर कडक बंदी असतानाही तस्करांनी आपला अवैध धंदा सुरूच ठेवल्याचे पुन्हा दिसून आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील नांदूरा- खामगांव रोडवरील पारखेड फाटा येथे कारवाई केली. यामध्ये, तब्बल 25लाख 35 हजारांचा गुटखा व तंबाखूजन्य साठा वाहनासकट जप्त करण्यात आला. या धाडसी कारवाईत एक गुटखा तस्कर पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील आंबुलकर यांना गुप्त माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. पारखेड फाटा येथे नाकाबंदी करून संशयित वाहन अडविण्यात आले. तपासणीदरम्यान अवैध गुटख्याचा प्रचंड साठा उघडकीस आला. पोलिसांनी रामराज दुल्हारे (48, रा. फतेपुर, उत्तरप्रदेश) या आरोपीसह वाहन जप्त करून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.ही धाडसी मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत अविनाश जायभाये यांच्यासह दिपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, गजानन गोरले व चालक निवृत्ती पुंड यांनी परिश्रम घेतले.
गुटख्याचे गुजरात कनेक्शन!
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक सुरू असल्याचे पोलिसांना समजले. विक्रीसाठी गुजरात राज्यातून ही वाहतूक होत असल्याची माहीती समोर आली. यामुळे, गुटख्याचे गुजरात कनेक्शन असल्याचे सिद्ध झाले आहे.
50.35 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
या कारवाईत पोलिसांनी आरोपीजवळून 25 लाख 35 हजार किमितीचा गुटखासाठा व 25 लाख किमतीचे कंटेनर वाहन असा एकूण 50 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांकडून उर्वरित आरोपींचा शोध
स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी एका जणाला अटक केली असून उर्वरित आरोपी निष्पन्न करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. उर्वरित आरोपींच्या शोधात पोलीस रवाना झाले आहेत.