डोणगाव : मेहकर तहसीलदार व त्यांचे पथक अवैध उत्खनन पाहणीसाठी देऊळगाव साकर्शाकडे जात असताना मध्येच त्यांना विनापरवाना मुरूम घेऊन जाताना एक ट्रॅक्टर दिसून आले. ट्रॅक्टरला पकडले मात्र पंचनामा सुरू असतानाच ट्रॅक्टर चालकाने अंधाराचा फायदा घेत, ट्रॅक्टर पळविले दरम्यान याप्रकरणी तहसीलदार यांच्या तक्रारीवरून जानेफळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहकर तहसीलदार निलेश मडके, जानेफळ मंडळाधिकारी, तलाठी व दोन पोलीस कर्मचारी हे 18 डिसेंबरच्या रात्री 8 वाजता दरम्यान देऊळगाव साकर्शाकडे जात असताना पाथर्डी गावाजवळ त्यांना एक विना नंबरचा ट्रॅक्टर मुरूम घेऊन जात असताना दिसून आला. ट्रॅक्टर चालकाला थांबवून विचारणा केली असता त्याच्याजवळ परवाना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी पंचनामा सुरू केला. पंचनामा करत असताना चालकाने मुरूमासह ट्रॅक्टर पळवून नेले. या प्रकरणी जानेफळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.