dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाची शिक्षेला स्थगिती नाही : आमदारकीवर टांगती तलवार

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळाला असला तरी त्यांच्यावरील टांगती तलवार अद्याप कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सदनिका घोटाळा प्रकरणात कोकाटे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे त्यांची तूर्तास तुरुंगात जाण्यापासून सुटका झाली असली, तरी त्यांच्या आमदारकीबाबतचा सस्पेन्स मात्र आता अधिकच वाढला आहे.

नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या कोकाटे यांच्या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने कोकाटे यांना एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे कोकाटे यांना मोठा वैयक्तिक दिलासा मिळाला असून त्यांची संभाव्य अटक सध्या टळली आहे. मात्र, न्यायालयाने केवळ जामीन दिला असून त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.  उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे कोकाटे यांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी वेळ मिळाला आहे. मात्र, शिक्षेला स्थगिती न मिळाल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top