dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पाचपीरवाडीचे तीन सुपुत्र बनले अधिकारी; गावातून काढली मिरवणूक

लासूर स्टेशन: मनात कठोर परिश्रम करण्याची जिद्द असेल तर नशीबही नतमस्तक होते, याचा प्रत्यय गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी येथील तीन तरुणांनी दिला आहे. 

दोघांची पीएसआयपदी, तर एकाची लेफ्टनंटपदी निवड

लासूर स्टेशन: मनात कठोर परिश्रम करण्याची जिद्द असेल तर नशीबही नतमस्तक होते, याचा प्रत्यय गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी येथील तीन तरुणांनी दिला आहे. गावच्या दोन सुपुत्रांची पोलिस उपनिरीक्षकपदी, तर एकाची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नुकताच मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.

अनिल गिरजाराम नायमने आणि सुनील विठ्ठल जंघाळे हे दोघे सध्या पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. कर्तव्यावर असतानाच त्यांनी एमपीएससीचा अभ्यास करून पीएसआय पदाला गवसणी घातली, तसेच उत्कर्ष गोरख मोहरे याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी भारतीय सैन्यात ‘लेफ्टनंट’ पद मिळवून एनडीए परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर २०५ वा क्रमांक पटकावला. या यशोगाथेबद्दल गावातून बँड-पथकाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत नुकतीच त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वेरुळचे अभयानंदगिरी महाराज, शेतकरी नेते महेश गुजर, सरपंच संजय सुलाने आदींची उपस्थिती होती. ‘दहावीत कमी गुण मिळाल्याने निराश न होता, जिद्दीने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते,’ असे मत उत्कर्ष मोहरे याने सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. सरपंच नेहरू जारवाल मित्रमंडळ व ग्रामस्थांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top