dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पान टपरी चालकावर पिस्टल रोखणारे तिघे गुन्हेशाखेच्या जाळ्यात : गावठी पिस्टलसह जीवंत काडतूस, धारदार चाकू जप्त

छत्रपती संभाजीनगर : सिगारेट आणि पाच हजार रुपये दे असे म्हणत निराला बाजार परिसरातील एका पान टपरी चालकावर पिस्टल रोखणाऱ्या चार जणांपैकी तीन जणांना गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. अटकेत असलेल्या तिघांच्या ताब्यातून पोलिसांनी एक गावठी बनावटीचे पिस्टल, एक जीवंत काडतूस आणि एक धारदार चाकू जप्त केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सोमवार, 2 फेब्रुवारी रोजी दिली.

छत्रपती संभाजीनगर : सिगारेट आणि पाच हजार रुपये दे असे म्हणत निराला बाजार परिसरातील एका पान टपरी चालकावर पिस्टल रोखणाऱ्या चार जणांपैकी तीन जणांना गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. अटकेत असलेल्या तिघांच्या ताब्यातून पोलिसांनी एक गावठी बनावटीचे पिस्टल, एक जीवंत काडतूस आणि एक धारदार चाकू जप्त केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सोमवार, 2 फेब्रुवारी रोजी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण गणेश तांदळे (25 वर्ष), रा. दगडगल्ली, औरंगपुरा, जय कन्हैय्या भांडारकर (23 वर्ष), रा. हनुमान मंदीर मागे, मोदीखाना, जालना, रितेश पारस पहाडीया (23 वर्ष), रा. कुंवारफल्ली, राजाबाजार, अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची नावे आहेत. तर साहील चांडक (23 वर्ष), रा. दगडगल्ली, औरंगपुरा असे फरार आरोपीचे नाव आहे. आशिष रामेश्वर काष्टे (24 वर्ष), रा. चौराहा यांची निराला बाजार परिसरातील अशोक रेस्टॉरंटच्या बाजूला पानटपरी आहे. रविवार, 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास करण तांदळे, जय भांडारकर, रितेश पहाडीया हे तिघेही दुचाकीवर काष्टे यांचया पानटपरीवर आले. त्यानंतर त्यांनी साहील चांडक याला बोलावून घेतले. साहील चांडक याने आशिष काष्टे यांना करणला 5 हजार रुपये आणि एक सिगारेट दे असे सांगितले. त्यावेळी आशिष काष्टे यांनी पैसे आणि सिगारेट देण्यास नकार दिला होता. त्यानंतर करण तांदळे याने त्याच्याजवळील चाकू काढून आशिष काष्टे यांना पैसे दे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. तर जय भांडारकर याने आपल्याजवळील पिस्टल काष्टे यांच्यावर रोखत पैसे व सिगारेट न दिल्यास मारुन टाकू अशी धमकी देत धक्काबुक्की केली. धक्काबुक्कीदरम्यान त्यांनी पान टपरीच्या गल्ल्यांतील 7 हजार रुपये रोख आणि सिगारेटची पाकीटे घेवून पोबारा केला होता.

या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर येवले, सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन कदम, अभिजित चिखलीकर, पोलिस अंमलदार योगेश गुप्ता, राजेंद्र साळुंके, श्रीकांत काळे, विनोद परदेशी, जालींदर गोरे, विक्रम खंडागळे, अजय दहीवाल, मनोहर गिते, अभिषेक बाठे, रोहीत जाधव, सागर साळवे, निहाल सोनटक्के, संतोष चौरे आदींच्या पथकाने सापळा रचून करण तांदळे, जय भांडारकर, रितेश पहाडीया या तिघांना अटक केली. तिघांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्टल, एक जीवंत काडतूस, एक धारदार चाकू जप्त केला. पुढील कारवाईसाठी तिघांना क्रांतीचौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top