हजारो भाविकांनी घेतले जगदंबेच्या मुखवट्याचे दर्शन; वडोद तांगडा येथे श्री. जगदंबा यात्रोत्सवाला अलोट गर्दी

जालना :  भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथे ग्रामदैवत श्री. जगदंबा देवीच्या यात्रोत्सवाला बुधवार, 11 मार्चपासून सुरुवात झाली असून गुरुवारी दुपारी 2 वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवीच्या चांदीच्या मुखवट्याची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पारंपरिक हलगीच्या तालावर भाविकांनी ठेका धरला. दरम्यान, यावेळी मुखवटा मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. 

     वडोद तांगडा येथील श्री. जगदंबा उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा असून या उत्सवासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात. साधारणपणे एक लाखांवर भाविक येथे उपस्थिती लावतात. बुधवारी रात्री पारंपरिक पद्धतीने गणपतीचे सोंग काढण्यात आले. देवीचा उत्सव निर्विघ्नपणे साजरा व्हावा, अशी प्रार्थना यानिमित्ताने करण्यात आली. गुरुवारी दुपारी 2 वाजता देवीच्या चांदीच्या मुखवट्याची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. हा मुखवटा वाजतगाजत जगदंबा देवीच्या मंदिरातील तांदळ्यावर विधिवत बसविण्यात आला. यावेळी भाविक रेवडी देखील उधळत देवीचा आशीर्वाद घेतात. 

 शुक्रवारी पहाटे देवीची स्वारी

गुरुवारी मुखवटा मिरवणूक झाल्यानंतर बारागाडे हा नवस फेडण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडला. रात्रभर विविध देवी देवतांची सोंगे काढण्यात येतात. दरम्यान, शुक्रवार, 13 मार्च रोजी पहाटे 5 वाजता श्री. जगदंबा देवीची स्वारी निघणार आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »