Memories with Nilu Fule awakened by Kiran Mane : किरण माने यांनी निळू फुलेंसोबतचा एक फोटो देखील शेअर केला. त्याचप्रमाणे त्यांनी या फोटोमागचा किस्सा देखील सांगितला आहे. नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला.
मुंबई : मराठी कलाकारांसाठी निळू फुले हे नाव कायमच खास ठरते. 13 जुलै रोजी त्यांना जाऊन 15 वर्ष होत आहेत. त्याचनिमित्ताने अभिनेते किरण माने यांनी खास पोस्ट लिहिली आहे. किरण माने यांनी निळू फुलेंसोबतचा एक फोटो देखील शेअर केला. त्याचप्रमाणे त्यांनी या फोटोमागचा किस्सा देखील सांगितला आहे. नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला.
‘1980 नंतरचा काळ…मायणीमधलं ‘गरवारे टूरींग टॉकीज’, तंबू थेटरमध्ये ‘शनिमा’ बघताना घाबरुन आईला चिकटून बसलेला मी! कारण पडद्यावर ‘कर्रकर्रकर्र’ असा कोल्हापुरी चपलांचा आवाज करत ‘त्यानं’ एन्ट्री घेतलेली असायची. बेरकी भेदक नजर – चालन्याबोलन्यात निव्वळ ‘माज’ – नीच हसनं, शेजारी बसलेल्या माझ्या गावांतल्या अडानी आया-बहिनी रागानं धुसफूसायला लागायच्या. सगळीकडनं आवाज यायचा : “आला बया निळू फुल्या..! मुडदा बशिवला त्येचा. आता काय खरं न्हाय.” थिएटरमधल्या शांततेला चिरत त्यो नादखुळा आवाज घुमायचा “बाई,आवो आपला सोत्ताचा यवडा वाडा आस्ताना तुमी त्या पडक्यात र्हानार? ह्यॅS नाय नाय नाय नाय बाईSS तुमाला तितं बगून आमाला हिकडं रातीला झोप न्हाय यायची वोS” आग्ग्गाय्य्यायाया…अख्ख्या पब्लीकमध्ये तिरस्काराची एक लाट पसरायची…