पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात शेतकऱ्याच्या स्प्रिंकलर नोझल आणि पाईपवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी सोमवार, 8 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास झाली असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत संदीप देशमुख ( रा. पिंपळगाव रेणुकाई ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतातून ५ स्प्रिंकलर नोझल आणि जैन कंपनीचे ३ पाईप असे अंदाजे ४,९०० रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेका प्रकाश सिनकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
कृषि साहित्यावर वक्रदृष्टी
चोरट्यांनी आता रोख रक्कम, दागदागिने यासह शेतीतील धान्य, उत्पादने, कृषि अवजारे, साहित्यावर देखील डल्ला मारायला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.