मंठा : येथील दायमा परिवाराच्या वतीने रविवारी दमा असलेल्या रुग्णांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. मागील शंभर वर्षांपासून दायमा परिवाराच्या वतीने दमा असलेल्या रुग्णांना मोफत औषधीचे वाटप करण्यात येते. या परिवारातील तिसऱ्या पिढीकडून सध्या औषध वाटपाची परंपरा सुरू आहे.

सध्या या परिवारातील सोमनाथ दायमा, संतोष दायमा आणि पप्पू दायमा दमा असलेल्या रुग्णांना औषधीचे वाटप करतात. जूनमधील मृग नक्षत्र व कोजागिरी पौर्णिमेला असे दोन वेळेस दमा असलेल्या रुग्णांना मोफत औषधीचे वाटप करण्यात येते. ही आयुर्वेदिक औषधी घेण्यासाठी मुंबई, ठाणे, बार्शी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, चिखली, बुलढाणा, परभणी, परतूर – मंठासह जालना जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने येतात. यावर्षीपासून रुग्णांची वाढती संख्या पाहता श्री रेणुका देवी मंदिर परिसरात औषधीचे वाटप करण्यात आले. औषधी वाटप करण्यासाठी उमेश दायमा, संतोष तिवारी, दिनेश दायमा, गोविंद दायमा, कपिल तिवारी, गोपाल दायमा, शुभम दायमा, सौरभ दायमा, कृष्णा चिंचणे, रमण दायमा, अनुराग कासट, सोमेश चोकडा, यश तिवारी, सुदर्शन भुतडा, मधुर मणियार, संजय बोराडे, जय दायमा, खुशी दायमा यांनी परिश्रम घेतले.
दमा रुग्णांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नगराध्यक्षा वंदना बोराडे यांनी केली. रात्री मुक्कामाची व्यवस्था व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बालासाहेब बोराडे यांनी अनुसया माता मंदिर सभागृहात केली. व्यापारी मोहन गोयल यांनी फराळाची व्यवस्था केली होती.