dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गोवंशाचे मुंडके, मांस  आढळल्याने खळबळ : गोरक्षक, बजरंग दलाचा बसस्थानकासमोर रस्तारोको 

जालना :  शहरातील राजा बाग शेर सवार परिसरातील कब्रस्थानासमोरील एका खड्ड्यात गोवंशाचे मुंडके,  मांस आढळून आल्यामुळे सोमवारी शहरात एकच खळबळ उडाली. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. 

जालना :  शहरातील राजा बाग शेर सवार परिसरातील कब्रस्थानासमोरील एका खड्ड्यात गोवंशाचे मुंडके,  मांस आढळून आल्यामुळे सोमवारी शहरात एकच खळबळ उडाली. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला.  दरम्यान,  या घटनेच्या निषेधार्थ बजरंग दल,  गोरक्षकांच्या वतीने  बसस्थानकासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.  यामुळे काही काळासाठी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.    

     शहरातील राजा बाग शेर सवार कब्रस्तानासमोर कुर्बानीचे वेस्टेज  टाकण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. मात्र, सोमवार,  9 जून रोजी या खड्डयात गोवंशाचे मुंडके, मांस फेकलेले आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर कदीम जालना,  चंदनझिरा पोलिसानी  घटनास्थळावर धाव घेत  पाहणी केली. यावेळी मांसाचे नमुने घेऊन लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले. दरम्यान, या घटनेनंतर  बजरंग दल आणि गोरक्षकांच्या वतीने स्थानक परिसरात मुख्य रस्त्यावर जोरदार  घोषणाबाजी करीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.  दरम्यान, या प्रकरणी प्रकरणी कठोर कारवाईची मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.  

गोवंश हत्याबंदी कागदावरच!

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे. मात्र, या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही. सर्रासपणे गायींची, गोवंशाची कत्तल केली जात आहे. त्यांची वाहतूक केली जात आहे. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायदा हा फक्त कागदावर न राहता त्याची अमंलबजवणी करावी, अशी मागणी बजरंग दल आणि गोरक्षकांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top