आदिशक्ती मुक्ताई पालखीचे भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत: आ.संजय गायकवाडांनी सहकुटूंब केले पूजन

बुलढाणा :  आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पालखीचे सोमवार 9 जून रोजी शहरात आगमन झाले. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी सहकुटूंब पालखीचे स्वागत करून पूजन केले. यावेळी शहरातील भाविकांनीही पालखीचे दर्शन घेतले.

बुलढाणा :  आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पालखीचे सोमवार 9 जून रोजी शहरात आगमन झाले. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी सहकुटूंब पालखीचे स्वागत करून पूजन केले. यावेळी शहरातील भाविकांनीही पालखीचे दर्शन घेतले.

यावेळी आदिशक्ती मुक्ताई संस्थानचे ह.भ.प. हरणे महाराज यांनी आ.संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून बुलढाणा शहरात पूर्णत्वास येत असलेले वारकरी भवन वारकऱ्यांसाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी आमदार संजय गायकवाड, माजी नगराध्यक्ष पुजाताई संजय गायकवाड, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीरा मृत्युंजय गायकवाड उपस्थित होते. यावेळी आ.गायकवाड यांनी शहरातील नगरप्रदक्षिणेच्यावेळी पालखीच्या रथाचे सारथ्य केले.

युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी पालखीला खांदा देऊन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी, शिवसेनिक माता-भगिनी परिसरातील ग्रामस्थ भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »