Tempreture incrise: मार्च महिन्याच्या प्रारंभीपासूनच तापमानात वाढ झाली आहे. उन्हाचा पारा चढत असल्याने सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणू लागली. तापमान बदलामुळे दुपारी उकाडा जाणवत आहे तर रात्रीची गरम हवा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत असल्याने आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे.
लोणार/प्रतिनिधी : मार्च महिन्याच्या प्रारंभीपासूनच तापमानात वाढ झाली आहे. उन्हाचा पारा चढत असल्याने सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणू लागली. तापमान बदलामुळे दुपारी उकाडा जाणवत आहे तर रात्रीची गरम हवा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत असल्याने आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे.
तापमान अतिशय उच्च आणि धोकादायक पातळीपर्यंत वाढत आहे. तापमानानं ४० अंशांची पातळी पार केल्यास काळजी घेणं जास्त गरजेचं झाल आहे. कारण त्याला उष्णतेची लाट म्हणता येईल. उष्णतेमुळे लहान मुलांच्या अंगावर पुरळ आणि चट्टे उठू लागल्याचे प्रकार समोर येत आहे. प्राथमिक टप्प्यात शरीरातील पाणी कमी होणे, पायात गोळे येणे, उकाड्याने थकवा जाणवने, असे प्रकार लहान–थोरांना जाणवत आहे.
तापमान वाढीने (Tempreture incrise) खालावली पाण्याची पातळी
पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाणी टंचाई निर्माण होऊन दुषित पाणी पिल्याने हि पोटाच्या आजारात वाढ होत आहे. यामुळे वाढत्या उन्हात शरीराची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.