भोकरदन येथे तळीरामाने पेटवली भर रस्त्यावर दुचाकी; मद्यधुंद अवस्थेत आईसोबत घातली हुज्जत

भोकरदन :  आठवडी बाजारात आईसोबत खरेदी करण्यासाठी भोकरदन शहरात आलेल्या एका तळीरामाने चक्क स्वतः ची मोटारसायकल पेटवून दिली. ही घटना  शहरातील छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शनिवार, 12 जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली. रामेश्र्वर वनारसे असे या तळीरामाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, यामुळे काहीकाळ या भागात वाहतूककोंडी झाली होती. 

सुरेश गिराम/ भोकरदन :  आठवडी बाजारात आईसोबत खरेदी करण्यासाठी भोकरदन शहरात आलेल्या एका तळीरामाने चक्क स्वतः ची मोटारसायकल पेटवून दिली. ही घटना  शहरातील छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शनिवार, 12 जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली. रामेश्र्वर वनारसे असे या तळीरामाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, यामुळे काहीकाळ या भागात वाहतूककोंडी झाली होती. 

     भोकरदन शहरात शनिवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात परिसरातील गावातून अनेक लोक येतात. तालुक्यातील फत्तेपूर येथील रहिवासी रामेश्वर वनारसे हा मद्यधुंद अवस्थेत त्याच्या आईसोबत बाजारात आलेला होता. दरम्यान, प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितल्यानुसार,

आईसोबत त्याची हुज्जत सुरू होती. त्याचवेळी त्याने सिनेस्टाईलने स्वतः ची मोटारसायकल चौकात आडवी करून त्यावर पेट्रोल ओतले आणि सिगारेट पेटवून दुचाकीला पेटवून दिले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे या परिसरात  खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन मोटारसायकलला लावलेली आग विझवली. यावेळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करून या तळीरामाला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिस ठाण्यात देखील या तळीरामाने पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचे सांगण्यात आले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »