डोणगाव : पोलीस स्टेशन हद्दीतील आंध्रृड येथे जमिनीवरील अतिक्रमणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ११ जून रोजी सकाळी घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरुन रात्री उशिरा १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

डोणगाव : पोलीस स्टेशन हद्दीतील आंध्रृड येथे जमिनीवरील अतिक्रमणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ११ जून रोजी सकाळी घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरुन रात्री उशिरा १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आंध्रृड येथील पंजाबराव मानीकराव देशमुख (57 वर्ष) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते गावात हजर असताना अनुराग रौंदळे, धनंजय रौंदळे वैजीनाथ रौंदळे, योगेश बनसोडे, गोविंद बनसोडे, सुभाष वैदय, मंगेश बनसोडे (सर्व रा. आंध्रृड) यांनी गैरकायद्याची मंडळी एकत्रित आणली. त्यातील अनुराग आणि धनंजय हे गाडीच्या खाली उतरले व त्यांनी अचानकपणे पंजाबराव देशमुख यांच्या गळ्याला पाठीमागून नायलान दोरी आवळली. समोरुन इतर जणांनी लोखंडी रॉडने मानेवर, छातीवर मारहाण केली. याशिवाय, जिवाने मारण्याची धमकीही दिली. तर, भागवत देशमुख याने त्याच्या सहकाऱ्यांसोबत देशमुख यांना जवळील टिनशेडमध्ये आणले, असे तक्रारीत म्हटले आहे. यावरून, उपरोक्त आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. दुसरीकडे दुसऱ्या गटातील मंगेश बनसोडे (24 वर्ष) याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले, की पंजाबराव मानीकराव देशमुख, गोपाल देशमूख, अक्षय देशमूख, उमेश देशमूख, नारायण देशमूख, उध्दव देशमूख, गोपाल देशमूख (सर्व. रा. आधुड) यांनी मंगेश बनसोडे यास व त्यांच्या मामास लोखंडी रॉड व काठीने मारहाण करून शिवीगाळ केली. पंजाबराव देशमुख व गोपाल देशमुख यांनी मंगेश बनसोडे याचे हात धरून दोरीने गळा आवळून जीवाने मारण्याचा प्रयत्न केला, यावरून पंजाबराव देशमुख यांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास डोणगाव पोलीस स्टेशनचे पीसाय संदीप सावळे हे करित आहे.