जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न करणे तलाठ्याला भोवले; नियुक्ती आदेश रद्द करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

जालना: अनुसूचित जमाती प्रवर्गातून तलाठी भरतीमध्ये नोकरीवर रुजू झाल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र साधन सादर करणे बंधनकारक आहे. मात्र असे न करणाऱ्या एका तलाठ्याची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी रद्द करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. वैजनाथ साहेबराव रुद्रे असे या तलाठ्याचे नाव आहे.  

     सन 2023 मध्ये निघालेल्या तलाठी भरतीमध्ये जालना जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत भरलेल्या पदामध्ये वैजनाथ रुद्रे यांची तलाठीपदी नियुक्ती करण्यात आली होती. अनुसूचित जमाती प्रवर्गातून त्यांची नियुक्ती असल्याने त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असताना देखील त्यांनी ते सादर केले नव्हते.  त्यानंतर त्यांनी जानेवारी 2025 मध्ये  जात वैधता प्रमाणपत्र तपासणीसाठी अर्ज केला होता. मात्र नियुक्ती वेळी दिलेल्या अटी शर्तींचे पालन न झाल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तलाठी वैजनाथ रुद्रे यांचे तलाठी पदाचे नियुक्ती आदेश रद्द करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत.

‘आप’ चे बोर्डे यांचा आक्षेप 

वैजनाथ रुद्रे यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आक्षेप आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष सुभाष बोर्डे यांनी नोंदवत या प्रकरणात त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात वेळोवेळी वैजनाथ रुद्रे यांना प्रशासनाने नोटीस देखील बजावल्या होत्या. ‘आप’ चे बोर्डे यांच्या आक्षेपानंतर प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »