जालना : जगातील सर्वात कठीण स्पर्धा मानल्या जाणाऱ्या हाफ आयर्नमॅन या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रख्यात जलतरण प्रशिक्षक कैलास झोळगे यांनी अभूतपूर्व कामगिरी करत लोहपुरुष हा बहुमान पटकावला आहे. या यशामुळे ते जालन्याचे पहिले आयर्नमॅन ठरले असून, शहराचा क्रीडा अभिमान अधिकच उंचावला आहे.

कोल्हापूर येथे रविवार 5 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत झोळगे यांनी सलग 1.9 किमी जलतरण, 90 किमी सायकलिंग, आणि 21.1 किमी धावणे असे एकूण 113 किमी अंतर केवळ 7 तास 5 मिनिटे 44 सेकंदात पूर्ण केले. ही कामगिरी त्यांची सहनशक्ती, शिस्त, चिकाटी आणि मानसिक स्थैर्य यांची साक्ष देणारी ठरली आहे. झोळगे यांनी आपल्या अथक मेहनतीने आणि विलक्षण एकाग्रतेने हे यश प्राप्त केले आहे. त्यांनी गोल्डन जुबिली स्कूल, जालना येथे सलग 13 वर्षे स्विमिंग प्रशिक्षक म्हणून कार्य केले आहे. सध्या ते जालना सिव्हिल क्लब येथे स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल शहरातील नागरिक, क्रीडाप्रेमी, विद्यार्थी व सहकारी वर्गाकडून त्यांचे कौतूक होत आहे.