बुलढाणा : शहरातील त्रिशरण चौक परिसरातून दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी एका तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील दोन जणांना शहर पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, चोरी केलेली ९० हजार रुपयांची सोन साखळी हस्तगत करण्यात आली असून, १९ मे रोजी मूळ मालकाला स्वाधीन करण्यात आली आहे.

बुलढाणा येथील तार कॉलनी भागातील रहिवासी सुमीत वसंता अंभोरे (30 वर्ष) यांनी २० फेब्रुवारी रोजी प्रकरणाची तक्रार दिली होती. त्यानुसार, चिखली रोड येथील एका हॉटेलवरून जेवण करून ते रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घराकडे जात होते. दरम्यान, त्रिशरण चौकात दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गाडी समोर येऊन ‘तुम्ही आमच्या गाडीला धडक दिली’ असे म्हणत तक्रारदार सुमित अंभोरे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी लंपास केली. त्यानंतर, चोरटे मलकापूर रोडच्या दिशेने फरार झाले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. यावरून पोलिसांनी, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार नरेंद्र ठाकरे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तातडीने तपाचक्र फिरवत, चोरट्यांना ताब्यात घेतले. यानंतर, १९ मे रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदार अंभोरे यांना चोरी झालेली सोनसाखळी स्वाधीन करण्यात आली. यावेळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, विद्यमान ठाणेदार रवि राठोड यांची उपस्थिती होती.
कामगिरी पथक…
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रवि राठोड, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग राजपूत, डी. बी. पथकातील पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवि मोरे व पोलीस हवालदार काकडे, यूवराज शिंदे, विनोद खोरे, कौतीक बोर्ड, चालक हवालदार रमेश वाघ यांनी ही कामगिरी केली.