Srinagar Bus accident: बस 150 फूट खोल दरीत कोसळून 21 ठार

दरीत कोसळून अपघातग्रस्त झालेली बस

Srinagar Bus accident: जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस १५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना 30 मे रोजी घडली. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 69 जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमीला उपचारासाठी नेत असताना स्थानिक व पोलिस
अपघातातील जखमीला उपचारासाठी नेत असताना स्थानिक व पोलिस

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस १५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना 30 मे रोजी घडली. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 69 जखमी झाले आहेत.
यात्रेकरूंची बस यूपीमधील हाथरस येथून जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिव खोडीकडे जात होती. यावेळी चोकी चोरा परिसरातील तंगली वळणावर हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असल्याचे सांगण्यात येत आहे. राजौरी जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलीस, नागरिक आणि एसडीआरएफ, एनडीआरएफ यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना जम्मूच्या अखनूर हॉस्पिटल आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे वाहतूक आयुक्त राजिंदर सिंग तारा यांनी सांगितले की, या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. तसेच, राजिंदर सिंग तारा म्हणाले, बस शिव खोडीकडे जात होती. इथले वळण अगदी सामान्य आहे. इथे काही अडचण आली नसावी, पण कदाचित ड्रायव्हरला झोप आली असावी. वळण्याऐवजी बस सरळ गेली आणि नंतर खोल दरीत कोसळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »